Home मुंबई ‘लिपिक गट क’ पदाचे पदनाम आता महसूल सहायक

‘लिपिक गट क’ पदाचे पदनाम आता महसूल सहायक

43

मुंबई : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लिपिक गट क’ कर्मचाºयांची तांत्रिक लिपिकऐवजी ‘महसूल सहायक’ असे पदनाम करावे अशी मागणी होती. राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे. सदर पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. (महासंवाद)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here