शेतकºयांचा सर्व कापूस खरेदी सरकारचा मोठा निर्णय

(Last Updated On: August 22, 2020)

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकºयांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. यावर्षी मागील 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकºयाचा कापूस खरेदी शिवाय राहणार नाही, असे आश्वासन पणनमंत्री जयंत पाटील यांनी दिले. कापूस पणन महासंघाच्या अडचणीसंदर्भात बैठकीत ते बोलत होते.
राज्यात यंदा कापसाची विक्रमी खरेदी झाली आहे. महासंघाने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकºयाचा कापूस खरेदीविना पडू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघाने घेतली आहे. राज्य शासन कापूस पणन महासंघासमोरील कापूस खरेदी संदभार्तील सर्व अडचणी सोडवून योग्य त्या उपाययोजना करेल तसेच दि कॉटन कापोर्रेशन आॅफ इंडियासोबत (सीसीआय) बैठक घेऊन या अडचणींतून मार्ग काढला जाईल. त्यामुळे पुढील हंगामात सुद्धा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावी लागली तर अडचणी येणार नाहीत त्यासाठी या उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असेही श्री. पाटील यांनी संगितले.
बैठकीला पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख, उपाध्यक्ष विष्णुपंत सोळंके, कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना आदी उपस्थित होते. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *