Home उपराजधानी नागपूर अबब! अमेरिकेत इतके तापमान

अबब! अमेरिकेत इतके तापमान

241

अभिवृत्त न्यूज ब्युरो
मागील काही दिवसांपासून भारतातील बिहार,आसाम, उत्तराखंड, महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पडत आहे़ यापैकी बिहार आणि आसाम राज्यातील नद्या तर दुथडीच काय त्यांनी धोक्याची पातळी गाठून सैरावरा सुटल्या आहे़ ब्रम्हपुत्र, कोसी, गंडक, गंगा अशा कितीतरी नद्यांना महापूर आले आहेत. पूर आणि भूस्खनामुळे कित्येकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोकांना आपल्या घरादाराचा त्याग करावा लागला आहे़ रस्ते, घरे, पूल, शेतातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे़ असे असताना मात्र अमेरिकेतील काही भाग उन्हाने जळत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या ‘डेथ व्हॅली’मध्ये मागील रविवारी दुपारी 3 वाजून 41 मिनिटांनी 130 अंश फॅरेनहाईट म्हणजे सुमारे 54 अंश सेल्सिअसची नोंद झाली. अमेरिकेच्या ‘नॅशनल वेदर सर्व्हिस’ने ट्विटद्वारे याबाबत जाहीर केले आहे.
‘डेथ व्हॅली’ हे पूर्व कॅलिफोर्नियामधील मोजावे वाळवंटात आहे. तसेच, ते उत्तर अमेरिकेतील सर्वात कमी, कोरडे आणि गरम ठिकाणांपैकी एक आहे. मागील वर्षी आॅगस्टच्या तुलनेत ‘डेथ व्हॅली’चे तापमान यंदा तीन अंशाने जास्त नोंदवण्यात आले आहे. 16 आॅगस्ट 2020 रोजी येथे तापमान 54.44 अंश सेल्सिअस इतके होते़ याबाबत ला वेगास येथील हवामानतज्ज्ञ डॅनिअल बर्क यांनी सांगितले की ती एक महाभयंकर अशी कोरडी हवा होती. हवेतील आर्द्रता 7 टक्क्यांनी कमी झालेली. अक्षरश: ओव्हनचे तापमान अंगाला झोंबत होते.
असेही सांगण्यात येते की, 10 जुलै 1913 रोजी ‘डेथ व्हॅली’मधील सर्वाधिक तापमान फर्नेस क्रीक येथे 134 डिग्री फॅरेनहाइट (57 अंश ) होते. तज्ज्ञ वर्षानुवर्षे या रेकॉर्डवर विश्वास ठेवू शकले नाहीत. एका नोंदीनुसार, जुलै 1913 मध्ये 56.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदल्या गेले. ट्युनिशियातील केबिली यांनी सांगितले की, जुलै 1931 मध्ये 55 अंश तापमान अनुभवास आले.
क्रिस्तोफर बर्ट यांनी वर्ष 2019 मध्ये या विक्रमाचा सर्वसमावेशक आढावा घेतला होता. अनेकांचा असा विश्वास आहे की 30 जून 2013 रोजी डेथ व्हॅलीमध्ये तापमान 129 फॅरेनहाइट होते. वर्ष 2016 आणि 2017 मध्ये कुवेत आणि पाकिस्तानमध्ये पृथ्वीवरील सर्वाधिक तापमान नोंदले गेले. तापमान वाढीबाबत विचार केला गेला तर, 130 अंश तपमान आतापर्यंतचे सर्वोच्च आहे. (छायाचित्रे : गूगल)