Home राष्ट्रीय 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी मास्क वापरावेत

12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी मास्क वापरावेत

84

नवी दिल्ली : नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनीही प्रौढांसारखे मास्क घालावे, अशी सूचना संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
मास्क घालण्यासाठी जगभरात जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही लागू आहेत. 12 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना मोठ्यांप्रमाणे कोरोनाचा धोका जास्त असतो. पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही. जेथे शारीरिक दूरता पाळली जात नाही अशा ठिकाणी किंवा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असलेल्या ठिकाणी मुलांनीही मास्क घालावे, असेही आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.