Home राजधानी मुंबई वीज बिलात सरकारकडून सवलत

वीज बिलात सरकारकडून सवलत

65

राज्य सरकारने तयार केलेल्या प्रस्तावात युनिट वापरानुसार सरकार दिलासा देणार आहे. मात्र, सरकारी तिजोरीवर हजार कोटींच्या आसपास मोठा भार येणार आहे.

मुंबई : कोरोना ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्व गटातील ग्राहकांना वीज बिलाचा धक्का बसला असून, जनतेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेत राज्य सरकार बिलात ग्राहकांना सूट देणार आहे. राज्य सरकारचा त्याबाबतचा प्रस्तावही तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संबंधित प्रस्तावानुसार, राज्यातील सर्वच वीज ग्राहकांचा यावर्षीच्या एप्रिल, मे, जून या महिन्यातील वीज वापर आणि याच महिन्यांसाठी 2019 साली केलेला वीज वापर लक्षात घेण्यात येणार आहे. 2019 साली जेवढा वीज वापर केला असेल तेवढ्याच वापराचे या वर्षीच्या तीन महिन्यांचे बिल ग्राहकांना भरायचे आहे. विशेष म्हणजे100 युनिटपर्यंतच्या वापरातील तफावत राज्य सरकार पूर्णपणे भरणार आहे.
अर्थात एप्रिल 2019 मध्ये एखाद्याने 60 युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी 100 युनिटचे बिल असतील तर त्याला 60 युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या 40 युनिटचे बिल राज्य सरकार भरेल. याच पद्धतीने वीज वापर 101 ते 300 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 50 टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here