रेल्वेतील फुकट्या प्रवाशांबद्दल माहिती आहे…

(Last Updated On: August 24, 2020)

नवी दिल्ली : रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी विनातिकिट प्रवास करणाºयांडून कोट्यवधींची वसुली केली आहे.
माहिती अधिकारानुसार, सन २०१९-२० मध्ये रेल्वेने देशभरात तब्बल एककोटीहून अधिक प्रवाशांना पकडण्यात आले होते. या सर्वांकडून ५६१.७३ कोटी रुपये वसूल करण्यात आले. २०१६ ते २०२० दरम्यान अशाप्रकार प्रवाशांकडून १ हजार ९३८ रुपये वसूल केले. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ४०५.३० कोटी, तर २०१८-१९ मध्ये ५३०.०६ कोटी रुपये कमावले. मागील आर्थिक वर्ष अर्थात २०१९-२० मध्ये एक कोटी 10 लाख प्रवाशी विना तिकिट प्रवास करताना पकडण्यात आले.
दरम्यान, अशा फुकट्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने नियम बनवले आहेत. किमान २५० रुपये वसूल केले जातात. कुणी दंड देण्यास नकार दिला तर प्रवाशाला आरपीएफकडे दिले जाते. त्याच्या विरोधात रेल्वे अधिनियम कलम १३७ गुन्हा दाखल केला जातो. यानंतर न्यायालयात संबंधितावर एक हजारपासून पुढे दंड लागू शकतो. यातही विरोध केल्यास सहा महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *