काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधीच

(Last Updated On: August 25, 2020)

नवी दिल्ली : नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी याच राहणार असल्याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेस पक्ष मुख्यालयात सोमवारी अध्यक्षपदासंदर्भात सलग सात तास बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
आपल्याला हंगामी अध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची मागणी कार्यकारिणीकडे केली होती. पक्षाच्या नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करावी, असे सोनिया गांधी यांनी बैठकीपूर्वी स्पष्ट केले होते. बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना हंगामी पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचे माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. याचवेळी सोनिया गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला इच्छुक नसल्यामुळे राहुल गांधी यांनी पद स्वीकारावे, अशी सूचना वरिष्ठ नेते ए.के अँटोनी यांनी मांडली.
त्यापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, आनंद शर्मा, शशी थरुर, मुकुल वासनिक यांच्यासह अन्य काहींनी पूर्णवेळ अध्यक्ष असावा, संघटनेच्या विविध पातळीवरील निवडणुका, सत्तेचे विकेंद्रीकरण, प्रदेश कार्यकारिणींचे सबलीकरण व्हावे, अशा स्वरुपाचे पत्र पाठवले होते.
नाराज राहुल गांधी
पक्षाच्या अंतर्गत मुद्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा करणाºया नेत्यांबद्दल ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत पत्र पाठवण्यासाठी ही वेळ योग्य नसून, आपण दुखावले गेले आहोत. हे मुद्दे कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चिले जावे, प्रसारमाध्यमांमधून नव्हे, असे म्हटले होते.
दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाºया पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी माफी मागावी, अशी मागणी पशुसंवर्धन तसंच क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *