Home प्रादेशिक मराठवाडा नीट,जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी रास्त

नीट,जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी रास्त

103

नांदेड : कोविड-19 मुळे जगभरात आव्हान निर्माण झाले असून यात सर्वच क्षेत्र ढवळून निघाले आहेत. भारतात शैक्षणिक परीक्षांचा कालावधी आणि दोन महिन्यांनंतर नवे शैक्षणिक वर्षे सुरू होण्याचा कालावधी हा कोविड-19च्या चक्रात अडकल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गैरसोय झाली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शासनही यात अत्यंत सावध भूमिका घेत असून नीट व जेईई परीक्षा पुढे ढकल्याव्यात, अशी होणारी मागणी रास्त असल्याची भूमिका पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. पालक म्हणून जे काळजीचे वातावरण आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.