मुद्रांक शुल्क दर कपातीमुळे दिलासा : थोरात

(Last Updated On: August 29, 2020)

मुंबई : येत्या ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत ३ टक्के तर ३१ मार्च २०२१ पर्यंत २ टक्के मुद्रांक शुल्क दर सवलतीमुळे सर्वसामान्य, शेतकरी वर्ग यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
श्री. थोरात म्हणाले की, सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर 1 सप्टेंबर 2020 पासून ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीकरिता 3 टक्क्याने तर 1 जानेवारी 2021 ते 31 मार्च 2021 या कालावधीकरिता 2 टक्क्याने कमी करण्यात आला आहे.
कोविड – 19 मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, राज्यात ‘मिशन बीगिन अगेन’ अंतर्गत उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिक आणि विविध संघटना यांच्याकडून मुद्रांक शुल्क कमी करण्याची मागणी महसूल विभागाकडे करण्यात येत होती. राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेऊन घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *