Home उपराजधानी नागपूर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा

114
state agro minister

नागपूर : शेतात काम करताना शेतकºयांसोबत अपघाताच्या वाढत्या घटना पाहता त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्यासाठी कृषी सहायकांनी गावपातळीवरील अशा अपघातांच्या घटनांची स्वेच्छेने नोंद घेवून कार्यवाही करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज वनामती येथील आढावा बैठकीत सांगितले.
आमदार आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, विस्तार प्रशिक्षण संचालक नारायण सिसोदे यांच्यासह जिल्हा उपनिबंधक अजय कडू, विभागीय उपसहनिबंधक संजय कदम उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकेल ते पिकेल यानुसार मंडळनिहाय पिकांचे क्लस्टर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात संत्र्यांचे सहा, भिवापुरी मिरची, जवस यांचे प्रत्येकी एक डाळी व कापसाचे चार क्लस्टर तयार करण्यात आले असून त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्री यांनी दिले.
कृषी विभागातील कृषी सहायक ते वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत सर्वांनी शासकीय चौकटीच्या पलिकडे जात शेतकºयांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सोयाबीन व भात पिकाचे प्रत्यक्ष पेरणीक्षेत्र वाढले असून जूनच्या दुसºया आठवड्या पेरण्या झाल्या. सरासरीच्या तुलनेत 25 आॅगस्ट पर्यंत 712 मीमी म्हणजे 67 टक्के पाऊस झाल्याची कृषी अधीक्षक अधिकारी माहिती श्री.शेंडे यांनी दिली. एकूण 171 शेतीशाळा घेतल्या असून यात 37 महिला शेतीशाळा घेतल्याची माहिती दिली. अपघात विमा योजनेत आतापर्यंत 51 प्रस्ताव सादर झाले असून त्रुटी पूर्ततेची कारवाई सुरू असल्याचे सांगितले.