शेतकरीसन्मानासंबंधी मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी

(Last Updated On: August 29, 2020)

मुंबई : कृषिप्रधान देशात शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून शेतकºयांना सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाºया संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात ‘पिकेल ते विकेल’ याधर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
केंद्र शासनाने शेती क्षेत्रामध्ये हाती घेतलेल्या सुधारणांबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र्र सिंग तोमर यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यातील मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादाजी भुसे त्यामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.
शेती क्षेत्राच्या सुधारणेसाठी केंद्र शासनाने आणलेल्या नवीन अध्यादेशाचे स्वागत करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की शेती आणि शेतकरी आपली संपत्ती आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या माध्यमातून शेतकरी कल्याणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यास मदत होईल. बाजारपेठेचे सर्वेक्षण करून ज्या मालाला बाजारपेठ आहे त्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकºयांना प्रवृत्त करण्यासाठी ‘पिकेल ते विकेल’ धोरणानुसार राज्यात काम सुरू आहे. राज्यात कृषी विद्यापीठे असली तरी कृषी आधारित संशोधनासाठी संस्था निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. नाफेडमार्फत कडधान्य आणि डाळींच्या खरेदीसाठीची २५ टक्क्यांच्या मर्यादेची अट रद्द करावी,अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *