पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरच्या आत

(Last Updated On: August 29, 2020)

नवी दिल्ली : पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या ३० सप्टेंबरच्या आत घेण्याचे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीचे परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य ठरवले आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाºया याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. परीक्षा घेतल्याशिवाय राज्य किंवा विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांना पदवी देता येणार नाहीत़ विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवलेल्या मुदतीत परीक्षा घेणे शक्य नसल्यास त्यांनी आयोगाशी विचारविमर्श करून परीक्षेच्या नवीन तारखा निर्धारित कराव्यात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. कोरोना प्रादुर्भावामुळे या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर युवा सेनेसह काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.
आदरच
सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचा राज्य शासन आदर करत असून यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.या निकालाचा तपशीलात अभ्यास करून राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. तसेच, या मुद्यावर आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणासोबतही चर्चा करू, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *