Home उपराजधानी नागपूर कोविड नियंत्रणासाठी झोननिहाय सनदी अधिकारी नियुक्त करा

कोविड नियंत्रणासाठी झोननिहाय सनदी अधिकारी नियुक्त करा

101

नागपूर : कोविडचा शहरातील वाढता संसर्ग पाहता कोविड नियंत्रणासाठी महानगरपालिकेला झोननिहाय सनदी अधिकारी देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले. विभागीय आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व मेडीकल, मेयोचे अधिष्ठाता उपस्थित होते.
सनदी अधिकारी दर्जाच्या अधिकाºयासोबतच संबंधित मनपा झोनचा अधिकारी, प्रत्येक रुग्णालयाचा एक प्रतिनिधी, वन विभागाचा एक अधिकारी आणि एनजीओचे दोन सदस्य अशी झोननिहाय समन्वय समिती गठित करून त्याद्वारे कोविडचे संनियंत्रण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सनदी अधिकाºयांच्या नेतृत्वात गठित झोननिहाय समन्वय समिती ही जिल्हा प्रशासन आणि रुग्णालयांमध्ये संवाद तसेच समन्वय ठेवेल. त्यानंतर वेबिनारद्वारे त्यांनी आज ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी, पत्रकार, सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्यांशीही संवाद साधला. वेबिनारमध्ये सहभागी सदस्यांच्या सूचनांची दखल पालकमंत्र्यांनी घेतली.
खासदार विकास महात्मे यांनी केलेल्या रशिया व चीनमध्ये वैद्यकीय पदवी घेतलेल्या मात्र कोरोनामुळे घरी असलेल्या विद्यार्थ्यांच्या सेवा घेण्याची सूचना केली. ग्रामीण भागातील पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य व अन्य यांनी आयएलएस सर्वेक्षण, नागरिकांना योग्य माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा. फक्त प्रशासन पूर्ण प्रयत्न करत असून नागरिकांनी देखील जबाबदारीने वागण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here