पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

(Last Updated On: September 1, 2020)

 

नागपूर : पूरग्रस्त कुटुंबाच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाºयांना दिले आहे.
जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काल 25 गावाला पुराचा विळखा पडला होता. आज सकाळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांच्यासह पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान तालुक्यात पुराने जनजीवन विस्कळीत झाले असून पिकांची मोठी हानी झाल्याचे दिसून आले.
खापरखेडा तालुक्यातील बीना नदीमुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे़ पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप नदीतील पुरामुळे पिकांची हानी झालेली आहे तसेच मौदा तालुक्यातील कन्हान नदीला आलेल्या पुरात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मौदा तालुक्यातील 18 गावे पुरामुळे बाधित झाले असून 1158 कुटुंबांना याचा फटका बसला आहे. साधारणत: 6186 हेक्टर अंदाजे शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मौदा यांनी तहसीालदार प्रशांत सांगाडे यांनी पालकमंत्र्यांना दिली. पालकमंत्री नितीन राऊत यांनी पूरग्रस्त भागातील गावकºयांची विचारणा करून त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली. पूरग्रस्तांना शेती, घरे व संसारपयोगी वस्तू यांचे तातडीने पंचनामे करून प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *