Home राष्ट्रीय माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन

82

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी [former president pranavda] यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. लष्कराच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. देशात सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
प्रणव मुखर्जी मागील काही दिवसापासून कोमात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होता़ मात्र, औषधाला प्रतिसाद मिळत नव्हता. ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. मुखर्जी यांच्या निधनाने पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट झाला आहे. सन २०१२-१७ या कालावधीत ते भारताचे राष्ट्रपती होते.
प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी बंगालमधील मिरीती गावात झाला. प्रणव मुखर्जी यांचे पिता कामदा मुखर्जी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. शिवाय पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य देखील होते. प्रणव मुखर्जी यांनी इतिहास, राज्यशास्त्र, कायद्याचा अभ्यास केला होता. १९६३ साली ते प्राध्यापक बनले. काही काळ पत्रकारिताही केली. १९६९ साली मुखर्जी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करत बांगला काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यसभेवर निवडून आले. सन १९७१ च्या सुमारास या पक्षाचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षात विलीनीकरण झाले. इंदिरा गांधी सरकारमध्ये ते मंत्री बनले.
दरम्यान, १९८६ साली नेतृत्वाशी मतभेद झाल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता़ १९८९ साली त्यांनी पुन्हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. २००४ मध्ये निवडणूक जिंकून ते लोकसभेचे सदस्य झाले. २०१२ पर्यंत अर्थात राष्ट्रपतीपदी विराजमान होईपर्यंत त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण, अर्थ मंत्रालयासारख्या महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद भूषवले होते. अफ्रिकन विकास बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, वर्ल्ड बँकच्या संचालक मंडळातही जबाबदाºया सांभाळल्या होत्या.