प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार

(Last Updated On: September 2, 2020)

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर मंगळवारी नवी दिल्लीत लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
प्रणव मुखर्जी यांना अखेरचा निरोप देण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, तसेच तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख यांच्यासह अनेकांनी मुखर्जी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि हर्षवर्धन, काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांनीही मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, दोन मिनिटे शांतता पाळून त्यांना आदरांजली वाहिली. एक प्रभावी नेतृत्व आणि प्रतिभावान संसदपटूला देश मुकला आहे, असे मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या शोक प्रस्तावात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *