कृत्रिम टाक्यांमध्ये गणेशबाप्पाला निरोप

उपराजधानी नागपूर

नागपूर : यंदा कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा न करण्याच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर राज्यातील समस्त भाविकांनी नियमांचे पालन करून श्री गणेश विसर्जन केले. अनेक शहरात घरगुती गणेश विसर्जनाला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली.
स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी अनेकांनी जबाबदारीची भूमिका घेउन घरी किंवा स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम टाक्यांमध्ये गणेशबाप्पाला निरोप देण्यात आला. तसेच, अनेकांनी घरगुती गणपतीचे विसर्जन घरीच आटोपून घेतले.
दरम्यान, दरवर्षी गणेश मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध असलेले तलाव बंद करण्यात आले होते.
तसेच, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडण्याकडे लक्ष द्यावे. बाहेर कृत्रिम टाक्यावर कोणत्याही प्रकारे विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, अशा प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी सामंजस्याने प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *