शाकाहाराचे अध्यात्मिक कारण…SAAY pasaaydan

रानशिवार

संत राजिन्दर सिंहजी महाराज

जेव्हा आपण शाकाहाराबद्दल विचार करतो, तेव्हा आपण आपल्या भौतिक शरीराच्या आरोग्याशी संबंध जोडतो. डॉक्टर आजारपण दूर करण्यासाठी तसेच चांगले आरोग्य ठेवण्यासाठी शाकाहार आहार सूचवतात; परंतु शाकाहार आपले मन व आत्मासाठी सुद्धा फायदेशीर आहे. आपण शाकाहाराची सात अध्यात्मिक कारणावर एक दृष्टीक्षेप टाकू यात.
शाकाहाराचे एक अध्यात्मिक कारण असे की अहिंसेच्या नियमाला अनुसरून आहे. अनेक संत महापुरुषानी लोकांना हत्या न करण्याची शिकवण दिली आहे. जर आपण आहारासाठी गाय अथवा कोंबड्याला कापताना पाहतो किंवा जाळ्यात फसलेले मासे तरफडताना पाहतो तेव्हा
आपल्याला लक्षात येईल की अशी हिंसा करताना किती यातना सहन कराव्या लागतात. अहिंसेचा स्वीकार केल्याने सर्व प्राणीमात्र तसेच मानव प्रभूंची संतान आहेत. या नात्याने आपण सर्व भाऊ-बहीण आहोत.
शाकाहारी बनण्याचे आणखी एक कारण की आपण आहार घेतलेल्या प्राण्याच्या प्रभावामुळे आपली चेतनतेचा नाश होण्यापासून वाचवले पाहिजे. आपण जे खातो, तसेच आपण बनतो. जेव्हा
आपण एखाद्या प्राण्याला खातो, तेव्हा त्याच्या प्रवृत्तीला सुद्धा आपण ग्रहण करीत असतो. मारल्या जाणाºया प्राण्यांमध्ये खूप भीती व तणाव उत्पन्न होऊन जाते. यामुळे त्याच्या शरीरात
कॉट्रीसोल व ऐड्रीनेलिनचे हार्मोन्स वाढतात त्यामुळे त्याच्या तणावात वाढ होते आणि शारीरिक प्रक्रियेत बिघाड होतो. असे हार्मोन्स कापलेल्या प्राण्याच्या शरीरात राहून जातात आणि आपण
जेव्हा अशा प्राण्यांना खातो तेव्हा ते हार्मोन्स आपल्या शरीरातील एक घटक बनतात. शाकाहार स्वीकारण्याचे तिसरे कारण असे की वैश्विक प्रेमाचा सिद्धान्ता मुळे अनेक महान धर्म संस्थापकांना प्रेरित केले आहे. ज्या लोकांनी सर्वांंसाठी प्रेमाचा सिद्धांत शिकवला त्यांनी सर्व प्राणीमात्र प्रभूच्या नामाचे लहान भाऊ-बहीण मानले आहे. सर्व धर्मप्रेमाचा धडा
शिकवतात. ज्या व्यक्ती अध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करते, ती आपल्या आत्म्याचे
परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी वैश्विक प्रेमाला वृद्धिंगत करतात.
शाकाहार अंगीकार करण्याचे आणखी एक कारण असे,की पृथ्वीवरील प्राणिमात्रांप्रति आणि पर्यावरणाची निष्काम सेवा, प्राणिमात्रांविषयी प्रेम आणि त्यांच्या संवर्धनात योगदान होय. तसेच मानवाच्या वर्तमान व भविष्याबद्दल पृथ्वीच्या संसाधनाच्या चांगला उपयोग घेण्यास
मदत मिळते. उदाहरणार्थ शास्त्रज्ञ सांगतात की आहारासाठी कापलेल्या गाईला खाऊ घालण्यासाठी जेवढे अन्नाचा वापर करतो त्यापेक्षा अनेक पटीत अन्न मनुष्याला खाण्यासाठी लागते. आपल्या पृथ्वीवरील संसाधने आपण जोपासली पाहिजेत, जेणेकरून भावी पिढी याचा उपयोग करू शकेल.
शाकाहारी बनण्याचे आणखी एक कारण आहे की कर्म सिद्धांत, जो आपल्याला सांगतो, की प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया होत असते. कर्माचे सिद्धांत सांगतो कीआपले चांगले आणि वाईट विचार, वचन व कर्माचे फळ किंवा दंड अवश्य मिळते. जेव्हा आपण एखाद्या जीवाला मारतो किंवा मृत जीवाला खातो, तर आपल्याला त्यांची शिक्षा भोगावी लागते.
शाकाहारी होण्याचे एक अध्यात्मिक कारण, की ध्यान अभ्यासामध्ये प्रगती करणे होय.
आपण शाकाहार स्वीकारल्याने इतर जीवाप्रति अहिंसा, प्रेम व सेवाभाव विकसित होतो. जर आपण अहिंसा आणि प्रेमाने जीवन जगलो, तर आपला पवित्र आत्मा आंतरिक मंडलात प्रवेश करून आपल्या परमात्माशी एकरूप होऊ शकतो. शाकाहारी बनण्याचे सातवे कारण असे की आत्मिक जागृती करणे होय. प्राण्यांना
खाल्ल्यामुळे आपण नवीन कर्म निर्माण करतो. महापुरुष शिकवतात, की आत्मिक जागृतीसाठी आणि सृष्टीकर्त्याशी एकरूप होण्यासाठी आपण कर्म कमी केले पाहिजेत. म्हणूनच आंतरिक ज्योती व श्रृतीच्या दीक्षा प्राप्तीसाठी शाकाहाराला अनिवार्य केले आहे. शाकाहार स्वीकारण्याचे ही सात अध्यामिक कारणे आहेत. शाकाहार आपले शरीर व
मनासाठी लाभदायक आहे; परंतु त्यापेक्षा आत्म्यासाठी महत्त्त्वाचा आहे. जर आपल्याला आत्मिक स्वरूप जाणून घ्यावयाचे असेल आणि प्रभूशी पुनर्मिलन करायचे असेल तर आपल्याला शाकाहारी जीवन अध्यामिक प्रगतीसाठी सहाय्यक ठरेल.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *