Tapori Turaki ….. शहरातील निकिताचं लग्न…

टपोरी टुरकी ....Jocks for You

एकदा बन्याला शिक्षकांनी प्रश्न विचारला.
शिक्षक : बन्या, सांग पाहू, असा कोणता तारा आहे, जो जमिनीवर राहतो. काही दिवसांनी आकाशात चालला जातो.
.
.
बन्या : खूप सोप्पंय…म्हातारा

***

एकदा एका खेडेगावात दवंडी देण्यात आली. लवकरच आपल्या गावात वीज येणार आहे. सर्व गावकरी नाचू लागले. शेजारी एक कुत्राही नाचू लागला. यातील एकाने त्या कुत्र्याला विचारले, तू का रे नाचत आहेस?
त्यावर कुत्रा उत्तरला, गावात वीज येईल तर, खांब पण लागतील ना!

***

एका लग्नाच्या पार्टीत बायको नवºयाला सांगते.
रिया : अहो बघा ना! तो पोरगा कधीपासून मला टकमक पाहतोय.
यावर नवरा नीरजने त्या पोराजवळ जात दोन-चार त्याच्या कानाखाली तीन चांगल्या ठेवून दिल्या… आणि म्हणाला, शहाण्या, हीच गोष्ट तीन वर्षांपूर्वी शहाणपणानं केली असती, त्तर आज मी सुखी राहिलो असतो.

***

एका शहरातील निकिताचं लग्न गोंदियातील खेडेगावात होते. एके सकाळी सासू दमयंती आत्या तिला कोठ्यात जाऊन म्हशीला चारा टाकायला सांगते…
म्हशीच्या तोंडात फेस बघून सौ़. निकिता परत येते. यावर सासू विचारतात, काय गं, काय झालं?
निकिता : अहो आत्याबाई, ती म्हैस अजूनही पेस्टने दात घासतेयं.
त्यावर दमयंती आत्यानं म्हैस सोडली अन् तिच्यावर बसून वावरात निघाली.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *