Home उपराजधानी नागपूर सुनालिनी सर्मा आकाशवाणी नागपूरच्या कार्यक्रम प्रमुख

सुनालिनी सर्मा आकाशवाणी नागपूरच्या कार्यक्रम प्रमुख

282

नागपूर : आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक (पश्चिम क्षेत्र मुंबई) यांच्या आदेशानुसार आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी श्रीमती सुनालिनी सर्मा [sunalinee sarmaa] यांनी १ सप्टेंबरपासून केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.
श्रीमती सुनालिनी सर्मा मागील 30 वर्षांपासून आकाशवाणीच्या सेवेत आहेत. कार्यक्रम आणि प्रशासनाच्या क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी सांगली,अमरावती आणि नागपूर केंद्रावर विविध विभागांमध्ये प्रमुख म्हणून कार्य केले आहे. अमरावती आकाशवाणी केंद्राच्या प्रारंभीच्या काळात श्रीमती सर्मा यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणून मोलाची भूमिका बजावली. त्यांनी आपल्या कल्पकतेने तयार केलेले अनेक कार्यक्रम श्रोत्यांमध्ये श्रवणीय तसेच लोकप्रिय ठरले आहेत.