Home BREAKING NEWS खेळ खल्लास, रिया चक्रवर्तीला अटक

खेळ खल्लास, रिया चक्रवर्तीला अटक

81

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, काळच त्यावर उत्तर देईल. सत्यमेव जयते, असे सोशल मीडियावरून भावनिक आवाहन करणाºया रिया चक्रवर्ती हिला आज मंगळवारी नार्काेटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने अटक केली.
सुशांतसिंह राजपूतसंबंधी ड्रग्ज चॅटच्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची आज सलग तिसºया दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू होती. रविवारी आणि सोमवारी झालेल्या चौकशीत रियाने कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा दावा केला होता. दरम्यान तिचे पितळ उघडे पाडण्यात आल्याने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तिला अटक करण्यात आली आहे. यानंतर संध्याकाळी ४ वाजता तिची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
बुधवारी अन्य आरोपी शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल, दिपेश आणि दोन कथित ड्रग्ज डीलर यांना न्यायालयात नेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वेगवेगळी बयाणे
मी केवळ सुशांतसाठी ड्रग्ज मागवत होते; पण कधीही सेवन केले नसल्याचे आरोपी रियाने सीबीआय चौकशीत सांगितले होते.आता एनसीबी अधिकाºयांना मात्र अंमली द्रव्यांचे सेवन केल्याचे कबूल केले आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणात रिया आणि शौविक ही दोन्ही भावंडे तपास यंत्रणाच्या ताब्यात आहेत.