Home राजधानी मुंबई आता कंगना रानावत, फक्त 24 तास

आता कंगना रानावत, फक्त 24 तास

129

मुंबई : प्रशासनाला दिलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्याने तसेच राहत्या घराचे रुपांतर कार्यालयात केल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने चित्रपट कलाकार कंगना रानावत हिला बीएमसी नियम 354 अ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. तसेच, पुढील 24 तासांत त्याबाबतचे योग्य आणि पटेल असे स्पष्टीकरण तसेच बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नोटीसमध्ये म्हटले की, कंगना हिचे कार्यालय बीएमसीला देण्यात आलेल्या नकाशाप्रमाणे नाही. अवैधरित्या बांधकाम असून तिने नियमांचे उल्लंघन केले आहे.
यात नियम 354 अ चे उल्लंघन केले असून संबंधित अनधिकृत बांधकाम स्वत: काढून टाका नाही तर प्रशासनाच्या वतीने ते तोडण्यात येईल, असेही बजावण्यात आले आहे.

हक्कभंग प्रस्तावही
विधानपरिषदेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आज दुपारी कंगना रानावतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. त्यापूर्वी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता.
दरम्यान, कंगना रानावत ही अंमली द्रव्याचे सेवन करत असल्याचे ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन यांचे पुत्र अध्ययन यांनी सन 2016 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते.