विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम 

राजधानी मुंबई

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोºहे यांची आज एकमताने विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली. दरम्यान, भाजपने उपसभापतीपदाच्या निवडणुकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सभात्याग केला. त्यांच्या अनुपस्थितीच नीलम गोºहे यांची आवाजी मतदानाने बिनविरोध निवड झाली.
नीलम गोºहे दुसºयांदा विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. दुसरीकडे उपसभापतीपदाच्या निवडणुकीला आक्षेप घेत भाजपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण कोर्टात असल्याने ही निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र, निवडणूक घेण्याचा हा सभापतीचा अधिकार असून तो न्यायालयीन कक्षेत येत नाही, असे सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक घेतली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर आवाजी मतदानानंतर नीलम गोºहे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
महिलांचे प्रश्न सोडविण्यास नीलमताई यांचे कायम प्राधान्य असते. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये न्याय मिळवून देण्यासाठी त्या स्वत: धावून जातात. त्यांची ही दुसºयांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे शुभेच्छापर भाषणात म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदस्य सर्वश्री जयंत पाटील, शरद रणपिसे, कपिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *