९ ते १२ वी वर्गांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

(Last Updated On: September 9, 2020)

नवी दिल्ली : देशभरात येत्या २१ सप्टेंबर २०२० पासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्ग ऐच्छिक तत्वावर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थांना, वह्या-पुस्तके, पेन्सिल, पेन, पाण्याच्या बाटल्या यांची देवाण-घेवाण करता येणार नाही. तसेच, शाळेत कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शाळेत येण्यासाठी पालकांची लिखित परवानगी असणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कमीत कमी सहा फुट अंतर राखणे आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मास्क घालणे बंधनकारक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *