Home राष्ट्रीय राफेलच्या पहिल्या तुकडीचा हवाई दलात समावेश

राफेलच्या पहिल्या तुकडीचा हवाई दलात समावेश

309

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा आज गुरुवारी अंबाला येथील वायुसेनेच्या तळावर विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला.
समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, फ्रान्सचे सैन्यदलमंत्री फ्लोरेन्स पार्ली, संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया वायुसेनातील अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये राफेल, सुखोई-३० आणि जगुआर विमानांसह भारतीय बनावटीची तेजस विमाने आणि सारंग हेलीकॉप्टरचा देखील समावेश होता.
दरम्यान, फ्रान्सकडून घेतलेली पाच राफेल विमाने सुमारे ७ हजार किमी अंतर पार करत 30 जुलै 2020 रोजी भारतात दाखल झाली होती. यादरम्यान या विमानांनी केवळ संयुक्त अरब अमिरातीमध्ये विसावा घेतला होता. फ्रान्सच्या टँकरनी जमिनीपासून ३० हजार फुटांवर त्यांच्यात इंधन भरले होते. तब्बल दोन दशकांनंतर पहिल्यांदा नवी लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात सहभागी झाली आहेत. ही विमाने हवेतून हवेत मारा करणाºया अद्ययावत क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून भारताच्या गरजेनुसार अनेक आवश्यक सुविधाही त्यामध्ये आहे. ( प्रतिकात्मक छायाचित्र )