Home टपोरी टुरकी ....Jocks for You छावी समोरच्या दुकानात गेली. Tapori Turaki

छावी समोरच्या दुकानात गेली. Tapori Turaki

141

बंटी : बाबा, मला शाळेच्या नाटकात एक रोल (भूमिका) मिळाला आहे
बाबा : कोणता रोल आहे.
मुलगा : नवºयाचा…
बाबा : अरे गाढवा, काही तरी डायलॉग असणारे काम का नाही मिळवले!

***

प्रियंकानं नवºयाला न सांगता नवे मोबाईल सीम विकत घेतले. त्याला सरप्राईज द्यावे, या हेतूने ती स्वयंपाकघरात गेली. नवीन क्रमांकावरून नवºयाला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,
हाय जानू,कसा आहेस…?
राकेश (दबक्या आवाजात) : नंतर बोलतो़ आमचं येडं किचनमध्ये आहे.
मग काय प्रियंकानं त्याच्यापाठी दोन-चार लाटण्यांचे तुकडे तुकडे पाडले.

***

समोरच्याला कधीही कमी समजू नका.
.
.
..

कदाचित ते तुमच्यापेक्षाही येडं असेल…

***

छावी समोरच्या दुकानात गेली. दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा संजय सोडला तर दुसरं कुणीही नव्हतं…थोडीशी लाजून म्हणाली, बोलायचं आहे.
संजय : बोला…
छावी : तुम्ही खूप छान दिसता…मला खूप खूप
आवडता तुम्ही.
संजय : ते काहीही असू दे; पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.
छावीनं दुकानाबाहेर धूम ठोकली.

***

डॉ. तरे : तुमच्या आजाराचं नेमकं कारण
माझ्या लक्षात येत नाहीयं…कदाचित दारू प्यायल्यामुळे असं होत असावं.
बाबूराव : हरकत नाही… तुमची उतरल्यानंतर येतो मी परत!

***

एक बेवडा दिन्याला म्हणाला, मी देव आहे.
दिन्या: ए बाबा घरी जा. तुला जास्त झालीयं.
बेवडा : खरंच मी देव आहे.
दिन्या : आता जातोस्स की…
बेवडा : मी सिद्ध करू शकतो.
दिन्या : कसे काय?
बेवडा दिन्याचा हात धरून त्याला समोरच्या घराजवळ नेतो. त्या घराची बेल वाजवतो.
एक बाई दार उघडते आणि बेवड्याला पाहताच म्हणते,
अरे देवा, तू परत आलासं वाटतं…

*****