Home आध्यात्मिक ठेविले अनंते तैसीची राहावे…SAAY pasaaydan

ठेविले अनंते तैसीची राहावे…SAAY pasaaydan

219

 संत राजिन्दर सिंहजी महाराज

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक कठीण प्रसंग आणि नैराश्य यांना सामोरे जावे लागते. या सर्व बाबी आपल्या इच्छेनुसार होत नसतात. आपण दुसºयांच्या बोलण्यावर आणि स्वत:च्या विचारांवर आणि बोलण्यावर नीट लक्ष दिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यातील काही बाबतीत अशी तक्रार असते की नियतीने आपल्या जीवनाशी काय खेळ मांडलेला आहे. खरंच, काही वेळा असं वाटतं हे जीवन कटुतेने भरलेले आहे आणि आपल्या वाटेला कटूता येते.
आपण कधी या जीवनाकडे एखाद्या नवीन दृष्टिकोनातून पाहिलं आहे का? आपण किती भाग्यवान आहोत याचा जरा विचार करा. शेवटी आपण मानवच आहोत. या भूमीवर किती प्रकारचे जीव आहेत बरे? इथे चार पायांचे, जमिनीवर रांगणारे, सरपटणारे इत्यादी जीव राहतात. अनेक प्रकारचे जीवजंतू हवेमध्ये तसेच पाण्यात सुद्धा राहतात. आपण मानव म्हणून जन्माला आलो, हे आपलं सौभाग्य आहे.
या जीवनासाठी आपल्यापैकी किती जणांनी प्रभुचे धन्यवाद मानलेत. जेव्हा काही गोष्टी बिघडतात तेव्हा आपण प्रभू कडे तक्रार करतो; परंतु त्या अन्य शेकडो गोष्टींबाबत काय ज्या आपल्याला प्रभूने दिलेल्या आहेत? आपल्याला पुरेसे भोजन दिले़ त्यामुळे आज आपण जीवित आहोत. आपल्याला वस्त्र आणि निवारा देऊन ऊन, पाऊस आणि थंडी यापासून आपलं रक्षण केलं आहे.
आपल्यापैकी बºयाच जणांचा एक परिवार आहे. त्यांच्याकडून आपल्याला प्रेम मिळतं. आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची शिकवण मिळते आणि आपण कामकाज करतो.
आपल्याला ज्या गोष्टी बक्षीस म्हणून दिल्या आहेत, तेव्हा आपण ही प्रभूची इच्छा आहे असं मानून चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही परिस्थितीचा समानरुपाने स्वीकार करतो. आपण जितका आनंदी जीवनाचा कालावधी स्वीकार करतो, तितकाच कष्टप्रद अशा कालावधीचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करू शकलो तर आपल्याला लक्षात येईल येईल की आपले जीवन प्रेम, शांती आणि आनंदमय आहे.
जीवनामध्ये शत्रूंनाही तेवढेच महत्त्व द्या, जेवढे आपण आपल्या मित्रांना देतो, जेणेकरून आपल्या जीवनातील बहुमूल्य श्वास तक्रारी आणि कटुता यामध्ये वाया घालवावे लागणार नाहीत. आपण आजारपणाचा काळ स्वीकारला पाहिजे जितका आपण आरोग्यदायी जीवनाचा करतो. असे केल्याने आपल्या जीवनातील ताण-तणाव आणि चिंता कमी होतील आणि आपल आरोग्य स्वास्थ्य जलद गतीने सुधारेल.
जीवन अनमोल आहे. आपल्याला जीवन पूर्णपणे जगायचं आहे काय? दु:ख आणि नैराश्य यांची तक्रार करून दु:ख आणि नैराश्य संपणार नाहीत. आपल्याला अशा प्रसंगातून जावेच लागेल. अशा प्रसंगातून जाण्यासाठी आपण शांतपणे प्रयत्न केला पाहिजे. आपली ऊर्जा वाचवली पाहिजे, जी आपण सर्वसाधारणपणे तक्रार करण्यातच खर्च करतो. या ऐवजी आपण प्रेम आणि कृतज्ञापूर्वक प्रभूचे ध्यान केले पाहिजे. आपल्याला जाणवेल की अति कठीण प्रसंगातून सुद्धा आपण सहजपणे पार पडू शकतो. प्रभूंकडून मिळालेल्या प्रत्येक बक्षीस गोड मानून घेतले पाहिजे. तेव्हा आपले पूर्ण जीवन आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचे जीवन मधुर होईल.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here