आॅक्सिजनची वाहतूक करणाºया वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

(Last Updated On: September 15, 2020)

मुंबई : कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा आॅक्सिजनची वाहतूक करणाºया वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने आज जारी केली आहे.
कोविड-19 रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन वायूचा पुरवठा सहजपणे उपलब्ध व्हावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 (2005 चा. 53) चे कलम 38 चे उप कलम (1) आणि उपकलम (2) मधील खंड (एल) आणि साथ रोग अधिनियम- 19871897 चा 3) चे कलम 2 अन्वये यासाठी या वाहनांना रुग्णवाहिका चा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार आपत्ती काळात पुढील एक वषार्साठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणा?्या आॅक्सिजन वायूची वाहतूक करणाºया वाहनांना रुग्णवाहिका समकक्ष वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येणार आहे. अशा वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 108 च्या उपनियम (7) तसेच, नियम 119 च्या उपनियम (3) च्या तरतूदी लागू करण्यात येत आहे, असे गृह विभागाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *