Home रानशिवार 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…

99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…

113

दयालपुरुष संत दर्शनसिंहजी महाराज यांच्या 99 व्या प्रकाशदिनानिमित संत राजिन्दर सिंहजी महाराज यांचा पवित्र संदेश…

‘सावन कृपाल रूहानी मिशन’ चे प्रमुख संत राजिन्दर सिंहजी महाराज यांनी दयालपुरुष संत दर्शन सिंहजी महाराज यांच्या 99 व्या प्रकाश दिनानिमित्त म्हणजेच जयंती दिनानिमित्त शिकागोहून(अमेरिका)यू -ट्यूबच्या प्रसारणाद्वारे आपला पावन संदेश समस्त मानवजातीसाठी दिला. त्यांच्या संदेशापूर्वी पूजनीय माता रिटाजी यांनी गुरू अर्जुन देवजी महाराज यांची वाणी ‘प्रभू मेरे प्रीतम प्राण प्यार’याचे गायन केले.
याप्रसंगी संत राजिन्दर सिंहजी महाराज ‘दर्शन – प्रेमदूत’ विषयावर आपल्या पावन संदेशात म्हणाले, आपण सर्व खूप भाग्यवान आहोत की, आपल्या सर्वांच्या जीवनात संत दर्शन सिंहजी महाराज यांचे आगमन झाले. ते प्रेमाचे महासागर होते. एवढे प्रेम त्यांच्याद्वारे प्राप्त होत होते की आज जी पण व्यक्ती त्यांना प्रत्यक्ष भेटली, ती हेच म्हणते की, संत दर्शन सिंहजी महाराज त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करत होते. महाराजांना असे वाटत की, आपण सर्वांनी प्रभूवर प्रेम करावे व परमात्म्याला जाणून घ्यावे. कारण प्रभूप्रेमाच्या मार्गाला अनुसरल्याने आपण परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो.
संत राजिंदर सिंह जी महाराजांच्या पावन संदेशाला यू -ट्यूबवर हजारो लोक पाहत व ऐकत होते.
‘सावन कृपाल रूहानी मिशन’ची स्थापना दयालपुरुष संत दर्शन सिंहजी महाराज यांनी आपले अध्यात्मिक सद्गुरु हुजूर बाबा सावन सिंहजी महाराज आणि परमसंत कृपाल सिंहजी महाराज यांच्या नावे केली. त्यांनी अध्यात्मिक शिकवणूक केवळ भारतातच नाही, तर विश्वातील कानाकोपºयापर्यंत प्रसारित करण्याकरता तीन विश्वयात्रा केल्या. ते आपल्या काळातील महान सुफी संत शायर होते. याकरिता १९८९ मध्ये त्यांना उर्दू अकादमी दिल्ली, पंजाब व उत्तर प्रदेशद्वारा सन्मानित केले गेले.
मिशनचे अध्यक्ष संत राजिन्दर सिंहजी महाराज आज विश्वभर भ्रमंती करून लोकांना ध्यान-अभ्यासाचा विधी शिकवितात,ज्याद्वारे आपण आपल्या मनुष्य जीवनाचे ध्येय – स्वत:ला ओळखणे व परमात्म्याला प्राप्त करणे, याला याच जीवनात पूर्ण करू शकतो.
संत राजिन्दर सिंहजी महाराज आज संपूर्ण विश्वात ध्यान अभ्यासाद्वारे प्रेम, एकता व शांतीचा संदेश प्रसारित करीत आहेत. फलस्वरूप म्हणून त्यांना विभिन्न देशांद्वारे अनेक शांती पुरस्कार व सन्मानांबरोबरच पाच डॉक्टरेटच्या पदव्या प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
‘सावन कृपाल रूहानी मिशन’ची आज संपूर्ण जगभरात ३००० पेक्षा अधिक केंद्रे स्थापित आहेत. मिशनचे साहित्य विश्वातील 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. तसेच, मुख्यालय विजयनगर, दिल्लीमध्ये, तर आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिका या ठिकाणी स्थित आहे.

*****