गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानी

(Last Updated On: September 16, 2020)

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेल माज्या मते राज्यात अग्रस्थानावर आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते गडचिरोली येथे अंतिम परीक्षा संदर्भात बैठक घेण्यासाठी येथे आले होते.
विद्यापीठाकडून परीक्षासंबंधी झालेली तयारी, अडचणी तसेच इतर अनुषंगिक विषयावर मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन जिल्ह्यात केले होते. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आॅनलाईन तसेच आॅफलाईन (प्रत्यक्ष) परीक्षेबाबत तयार केलेले मॉडेलची पाहणी केली. यामध्ये परीक्षा पद्धतीची निवड, अडचणी आल्यास पुन्हा परीक्षा तसेच अनुर्त्तीर्ण विद्यार्थ्यांबाबत पुन्हा संधी यातील नियोजन चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, संचालक परीक्षा व मूल्यमापन डॉ.अनिल चिताडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, सहायक जिल्हाधिकारी आशिष ऐरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील 17 हजार 229 विद्यार्थी अंतिम परिक्षा देणार असून यामध्ये चालू वषीर्चे 15 हजार 153 विद्यार्थी मागील वर्षी विषय राहिलेले 2,013 विद्यार्थी तर बहिस्थ 63 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा द्यावी असे प्राधान्य देण्यात आले होते. यानुसार 17 हजार 229 पैकी 90 टक्के विद्यार्थी घरातूनच आॅनलाईन परीक्षा देण्यासंदर्भात तयार झाले आहेत. तर 706 विद्यार्थी तांत्रिक अडचणीमुळे तसेच स्वत: निर्णय घेवून प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत. प्रत्यक्ष (आॅफलाईन) परीक्षा देणारे 706 विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होवू नयेत म्हणून जिल्हाधिकारी यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *