सीईटीसाठी अर्ज भरण्याच्या वाढवलेल्या कालावधीचा लाभ

(Last Updated On: September 17, 2020)

मुंबई : विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती. या वाढीव कालावधीचा लाभ ४८ हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
श्री. सामंत म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विविध सामाईक प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेता राज्य सीईटी सेलने दोन दिवसांचा कालावधी वाढविला होता. ७ व ८ सप्टेंबर २०२० असा हा दोन दिवसीय वाढीव कालावधी होता. ज्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या वाढीव कालावधीमध्ये विविध विद्या शाखांच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एमपीएड-३२५,बीपीएड-१२६५, बीएड-१६७१५, एमएड-६७७, एलएलबी (तीन वर्ष)-१२०१०, एलएलबी (पाच वर्ष)-४०६७, बीएड एमएड ६४९, बी.ए./बी.एस्सी. बीएड-११२३, एमसीए-१८९०,बीएचएमसीटी-३६१, एमएचएमसीटी-३७, एम. आर्किटेक्चर-२८७, एमएचटीसीईटी-९२२८ या अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *