Home राजधानी मुंबई पदवीचे प्रमाणपत्रावर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नाही

पदवीचे प्रमाणपत्रावर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नाही

318

मुंबई : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
आज गुरुवारी मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची परीक्षेसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी कुलगुरू शशिकला वंजारी मुख्यत्वे उपस्थित होत्या.
श्री. सामंत म्हणाले, की अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे. विशेषत: विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड-१९ च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. गतवर्षीप्रमाणे यावषीर्ही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही बदल असणार नाही. (महासंवाद)