नागपुरात अ‍ॅग्रोटेक सेंटर उभारणार : डॉ. नितीन राऊत

उपराजधानी नागपूर राजधानी मुंबई

मुंबई : नागपूर जिल्हा व परिसरातील शेतकºयांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठासाखळीला अधिक चालना देणे, ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देणे यासाठी अत्याधुनिक कृषी केंद्र्राची (अ‍ॅग्रोटेक सेंटर) उभारणी नागपूर येथे करणार असल्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित अ‍ॅग्रोटेक सेंटर उभारण्यासंदर्भात डॉ.राऊत यांची मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाºयांबरोबर बैठक पार पडली.
नागपूर व परिसराच्या कृषी क्षेत्रातील विशेष शेतमाल ज्या बाजारपेठेत मिळत नाही त्या ठिकाणी हा कृषी माल विकण्यासाठी सदर केंद्र चालना देईल. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच छताखाली सर्व माहिती आणि मदत करण्यात येईल, अशी माहिती टाटा टेक्नोलॉजीचे संचालक सुशिल कुमार यांनी दिली.
अ‍ॅग्रोटेक सेंटर उभारण्याच्यादृष्टीने नागपूर परिसराचा आणि राज्याच्या कृषी क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. सद केंद्र सार्वजनिक भागीदारीतत्त्वावर उभारले जाणार असून येथे कृषी व फळप्रक्रिया केंद्रही उभारले जाणार आहे.
बैठकीला हर्षवर्धन गुणे आणि अरुण खोब्रागडे आदी उपस्थित होते. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *