…अर्थातच, पुणेरी बबलीचा पाय घसरतो Tapori Turaki

(Last Updated On: September 18, 2020)

वर्गात हिंदीचा विषय सुरू…गुरुजी बाळ्याला विचारतात…
गुरुजी : संस्कृत भाषा में पत्नी को क्या कहते हैं?
बाळ्या : गुरुजी, संस्कृत छोड़िये़़़ किसी भी भाषा में पत्नी को कुछ नहीं कह सकते. जान है तो जहान है, भाषाएँ तो केवल ज्ञान है.

***

…अर्थातच, पुणेरी बबलीचा पाय घसरतो आणि ती पाण्यात पडते.
बबली : मला वाचवा…वाचवा वाचवा!
राजा (हा नागपूरचा) : थांबा, मी आत्ता रस्सी टाकतो.
बबली : टाकतो नाही रे, ‘फेकतो’ म्हणायचं, आणि ‘रस्सी’ नाही रे,‘दोरी’ म्हणायचं.
राजा: असं कर ना! तुझ्या मराठीच्या सरांना बोलव… मी जातो!

***

खटला नवीन बायको सुहासिनी विरुद्ध नवरा बंड्या (अर्थातच हा सुद्धा नवा)…
न्यायाधीश : तुम्हाला घटस्फोट का हवा आहे?
बंड्या : कारण, बायको मला लसूण सोलायला लावते, कांदे कापायला सांगते, भांडी घासायला आणि कपडेही!
न्यायाधीश : मग त्यात अवघड काय? लसूण थोडा गरम करून घ्या म्हणजे सोलायला सोपा होईल, कांदे कापण्यापूर्वी ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे कापताना डोळे जळजळणार नाहीत. भांडी घासण्यापूर्वी १० मिनिटे पाण्याच्या टबमध्ये ठेवा म्हणजे लवकर स्वच्छ होतील आणि कपडे धुण्यापूर्वी अर्धा तास ….
मध्येच बंड्या बोलला, सऱ़़ सर. आता मला समजलं…
न्यायाधीश : काय समजलं?
बंड्या : हेच की आपली अवस्था माझ्यापेक्षाही भयंकर आहे.

***

एके दिवशी भर सकाळी दामिनी स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकू आणि अक्षदा
लावत होती…
तेवढ्यात नवरा शेषाभाऊ आला…
शेषाभाऊ : अग्गं… हे काय करतेस?
दामिनी : अहो दसरा आहे ना आज! म्हणून शस्त्राची पुजा करतेयं…

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *