कधी मनात घट्ट बसतो तुझा अंबाडा
कधी नुस्ता गजºयात रमतो तुझा अंबाडा
भोर केस केसांना बिलगून असावे त्याने
एखादा नुसताच डोकावतो मिचकावतो
मग काय आळसावत जातो तुझा अंबाडा
तुही असते गंधाळली तोही मस्त सुवासी
कुशीवर थकते शिर भार हलका त्याचाही
पेंगतो नशेत डोलतो लाजरा तुझा अंबाडा
सैल होताच तो सैरभैर होतात रानोरानी
हुंदडतात पिसाटतात ती धुंद वाºयावरी
प्राशून घेतो बटांना सुस्त तुझा अंबाडा
संजय मुंदलकर