Home राजधानी मुंबई कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत सूचना आमंत्रित

कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत सूचना आमंत्रित

73

मुंबई : राज्याच्या कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. कॅराव्हॅन पर्यटन धोरणाचा मसुदा पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत सुचना व हरकती diot@maharashtratourism.gov.in व asdtourism.est-mh@gov.in या ईमेल आयडीवर 3 आॅक्टोबर 2020 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्राला वैविध्यपूर्ण सौंदर्य लाभले आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, पर्वतरांगा, थंड हवेची ठिकाणे, नदी, वनसंपदा, ऐतिहासिक वारसास्थळे, लेणी, धरणे अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनाची ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी कॅराव्हॅन पर्यटनासाठी मोठा वाव आहे. तसेच, अतिदुर्गम भागात हॉटेल, रिसॉर्टसारख्या राहण्याच्या सोयी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या क्षेत्रामध्ये कायमस्वरुपी बांधकामासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत अशा ठिकाणी कॅराव्हॅन व कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतील. शिवाय जेथे सध्या पक्के बांधकाम असलेल्या निवास व्यवस्था उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी कॅराव्हॅन पर्यटन करता येईल. या अनुषंगाने कॅराव्हॅन पर्यटन धोरण तयार करण्यात आले असून या संदर्भात सूचना व हरकती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here