Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

56

सातारा : दुसाळे ता.पाटण येथील शहीद नायक सचिन संभाजी जाधव यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना मानवंदना दिली. शासनाच्या वतीने राज्याचे सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, पाटणचे तहसीलदार समीर यादव यांनीही आदरांजली वाहिली.
दुसाळे गावातून सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून ग्रामस्थांनी आपल्या शूर भूमिपुत्राचे अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यदर्शन घेतले.
सातारा जिल्ह्यातील 111 इंजिनियर रेजिमेंटचे नायक सचिन संभाजी जाधव यांना 16 सप्टेंबर 2020 रोजी सैन्यामध्ये सेवा बजावताना वीरमरण प्राप्त झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here