Home राजधानी मुंबई पुढील महिन्यापासून हमीभावाने मूग खरेदी

पुढील महिन्यापासून हमीभावाने मूग खरेदी

156

मुंबई : राज्यात येत्या 1 आॅक्टोबरपासून मूग खरेदीला सुरुवात होणार असून ही खरेदी प्रक्रिया तीन महिने अर्थांत 90 दिवस सुरू राहणार आहे़ यासाठी181 खरेदी केंद्र्र प्रारंभ करण्यात आल्याची माहिती पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे 31 आॅगस्ट 2020 रोजी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून 15 सप्टेंबरपासून मूग खरेदीसाठीची नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत 230 शेतकºयांनी आपली नावे नमूद केली आहेत.
सुरू करण्यात आलेल्या केद्र्रांमध्ये विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे-29, मार्केटिंग फेडरेशनचे 105 व महाएफपीसीचे 47 असे एकूण 181 खरेदी केंद्र सुरू आहेत.  नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळवले जाईल. ज्या केंद्र्रावर नोंदणी केली आहे त्याच ठिकाणी शेतमाल घेऊन यावा, असेही मंत्र्यांनी म्हटले आहे. हंगाम 20-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मूग हमी भाव 7 हजार 196 असा जाहीर केला आहे. सर्व खरेदी आॅनलाईन पद्धतीने होणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.