नागपुरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू

(Last Updated On: September 19, 2020)

नागपूर : नागपुरात शनिवार आणि रविवारी असा दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात येत आहे. नागरिकांना स्वयंस्फूर्तीने सहभागी होत यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपुरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू घेण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घरातच राहण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. दरम्यान, शहरातील व्यापाºयांनीही या जनता कफ्यूर्ला पाठिंबा दिला आहे.
नागपुरात कोरोना संसर्ग वाढत असून संपूर्ण शहराचे आरोग्य राखणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना प्रत्येकाने आणखी सजग राहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *