अल कायदा संघटनेचे नऊ दहशतवादी अटकेत

राष्ट्रीय

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थाच्या (एनआयए) एका पथकाने शनिवारी पहाटे केरळमधील एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे एकाच वेळी कारवाई करत अल कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक केली आहे.
देशात पश्चिम बंगाल आणि केरळसह विविध ठिकाणी पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी संघटना अल कायदाच्या कारवाया सुरू असल्याची माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती़ त्यानुसार छापे टाकून ही अटक करण्यात आल्याचे माध्यमातील संस्थांनी म्हटले आहे. यातील तीन दहशतवाद्यांना केरळ, तर सहा दहशतवाद्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
साहित्य जप्त
अटकेतील जहाल आरोपींचा देशातील काही महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करून निरपराधांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता. तसेच, यासाठी निधी मिळवण्यात ते प्रयत्नरत होते़ या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे, दस्तावेज, धारदार शस्त्र, स्वदेशी बनावटीच्या बंदुका, स्थानिक बनावटीचे चिलखत, विस्फोटके तयार करण्यासंबंधीचे लेख आणि साहित्य जप्त करण्यात आले. अधिकाºयांकडून दहशतवाद्यांची सध्या कसून चौकशी सुरू असून जवळपास सर्वांची ओळख पटली असल्याचे सदर वृत्तात म्हटले आहे. (प्रतिकात्मक छायाचित्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *