शेतातील खळे झालीत गायब…शब्द लालित्य

ललित ...शब्दलालित्य

ज्वारीचं खुडणं आटोपत आलं की घरातील दोघे – चौघे मजुरांसह खळे तयार करण्याच्या तयारीला लागायचे़ शेतात मेहनतीनं तयार केलेली पिकं घरात यावी, यासाठी शाळेत जाणाºया पोरंटोरांसहीत सगळे कामाला यायची़ या दिवसांत घरातील कोणीही रिकाम्या हाती राहात नसे़ जो तो आपापल्या परीने कामाला हातभार लावत असे.

 

नांगरणी, वखरणी, पेरणी, निंदणी,डवरणी, वेचणी अशी विविध कामे म्हणजे शेतकºयाच्या रक्ताशी नाते सांगणारी! त्या प्रत्येक कामाची नाळ त्याच्या आयुष्याशी जुळलेली असते़ तसं त्याचं आयुष्यचं बेभरोशाचं असतं़ मग तो लहान असो की मोठा शेतकरी़़़निसर्गाच्या झोडप्याचा मार त्या दोघांनाही सहन करावा लागतो़ दोघांच्याही पाठीची ‘सालटं’ सारखंच निघतात़ रूमणं मोडलं, फास तुटली, बैल बसला, डवºयाची दांडी तुटली,मजुरानं आयत्यावेळी ‘औत’ पाडलं (म्हणजे चाट मारणे) अशा प्रकारांनी त्या दोघांच्याही नाकाला फेस येतो़ यात फरक इतकाचं की मोठा कास्तकार आपल्या ‘खांडका’वर लवकर मलम लावतो आणि लहान्याला कुथत दम धरावा लागतो़

तसा आपलं शिवार हिरवंगच्च दिसल्याशिवाय कुण्या शेतकºयाला झोप येत नाही़ मग सुरू होतो ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काऴ खरं तर वरचा पाऊस आला आणि नाही तरी निसर्ग त्याच्या ‘पेकाटा’त दरवर्षीच लाथ मारीत असतो़ मग खत, फवारणीचा जो मारा सुरू होतो, तो पाचवीला पुजल्यासारखाचं सुरू असतो़ मोठ्या शेतकºयाचं सोडा; पण लहान्यावर मात्र घरधनीनंच्या गळ्यातलं डोरलंही विकावं लागतं़
कुण्या एका शेतकºयाच्या जीवात जीव तेव्हा येतो जेव्हा शेत पिवळं दिसतं आणि हंगाम सुरू होतो़ मागील काही वर्षांपासून शेतकºयाच्या शेती हंगामात यंत्रानं अधिकच रस घ्यायला सुरुवात केली़ त्यामुळे शेतकºयाच्या घरातील पायांना ‘आराम’ मिळत आहे़ थे्रशर, हार्वेस्टर या सारख्या यंत्रांच्या मदतीने शेतमाल अगदी कमी दिवसांत घरात येत आहे़ सोयाबीन,ज्वारी या पिकांसाठी थे्रशर तर, गव्हासाठी हार्वेस्टर अशा अजस्र यंत्राचा उपयोग केला जातो़ विदर्भात साधारण: दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सोयाबीनचा प्रसार व्हायचा होता़ कापूस, हायब्रिड ज्वारी (त्यापूर्वी गावरान ज्वारी), तूर, हरभरा, गहू, जवस आदी पिकांचा
मोठा बोलबाला होता़ शेतीच्या हंगामात पहिलं ‘खळं’ हे ज्वारीसाठीचं असायचं़साधारणत: गावाभोवतालच्या ‘खारी’त किंवा गोठाणात खळ्यांचा ‘सडा’ पडायचा़ बहुतेक वेळा ह्या जागा ठरलेल्या असायच्या़ तरीही गावखारीतच खळ्याचं बस्तान असे़ ज्वारीचं ‘खुडणं’ आटोपत आलं की घरातील दोघे – चौघे मजुरांसह खळे तयार करण्याच्या तयारीला लागायचे़ शेतात मेहनतीनं तयार केलेली पिकं घरात यावी, यासाठी शाळेत जाणाºया पोरंटोरांसहीत सगळे कामाला यायची़ या दिवसांत घरातील कोणीही रिकाम्या हाती राहात नसे़ जो तो आपापल्या परीने कामाला हातभार लावत़ गावखारीत ज्वारीची फणकटं वखरून गोलाकार जागा साफ करण्यात येत़ खराट्यानं झाडून काटे-गोटे बाहेर काढली जात़ त्यानंतर दोन-चार वेळा पाणी मारून शेणानं सारविण्यात येत किंवा ‘गिलावा’ घेतल्या जाई़ यावेळी खळ्यातून कुणीही फिरकत नसे़ मोकाट जनावरांपासून सांभाळून राहावे लागे़ उन्हात खणखणीत वाळल्यानंतर त्या जागेच्या मध्यभागी पाच फूट उंचीचा लाकडाचा ‘खुटा’ रोवण्यात येई़ खळ्याच्याच शेजारी एक लहानसा ‘कोठा’ तयार होत़ याठिकाणी आराम किंवा झोपता येण्याची व्यवस्था असे़ बाजूलाच जनावरे बांधण्याकरिता चार – पाच खुटे रोवली जात़ ही सर्व काम पार पडेपर्यंत शेतातील ज्वारीचं खुडणं संपलेलं असे़ त्यानंतर कणसांचा ढिग खळ्यात आणण्यात येई आणि टप्प्याटप्प्यानं एकेका थरावर पाच ते सहा बैलांना फिरविली जात़ शेजारच्या किंवा ‘भावकी’तील घरातून जनावराची गरज भागविण्यात येई़ यात जवान आणि ‘खट्या’चाही समावेश असे़ खळ्याच्या भोवती कडब्याच्या ‘पेंड्या’ रचण्यात येत़ त्यामुळे ज्वारीचा दाणा खळ्याच्या बाहेर जात नसे़ खुट्याभोवती फिरणाºया बैलांमागे फिरणाºया व्यक्तीच्या हाती एक टोपले असायचे,जेणेकरून त्याचे शेण त्या टोपल्यात पकडता यावे़ हा गडी गाणे म्हणत बैलांना हाकलत असे़ कधीकधी तंगडे दुखल्याने तो कोठ्यात वा झोपडीत बसून थोडा दम घेत वा थोरामोठ्यांचे लक्ष दूर करीत बिडीचे दोन-चार झुरके घेवून तलफ भागवित असे़ कणावरून बैल फिरले की हवेची वाट पाहणे सुरू होई़ कारण आता ज्वारीला उफणण्याची वेळ अस़े एका लाकडाच्या फळीवर उभे राहत हातात टोपले घेऊन वाºयाच्या दिशेने ते खाली सोडायचे़ त्यामुळे दाणे खाली गोण्यावर एका बाजूला पडायचे आणि भुसा दूर जाऊन बसायचा़ कधी हवा कुंद व्हायची़ त्यामुळे तासन् तास तिची वाट पाहावी लागायची़ उफणणारी फळीवरून थोडासा खाली उतरला की हवा वाहायची़ एकदा हा प्रकार आटोपला की सगळी ज्वारी एकत्र करून पोत्यात बंद व्हायची़ ही मोत्यांची रास घराकडे बंडीतून निघायची़ यावेळी बैलांना सजविण्यात येई़ त्यांच्या अंगावर झुल टाकण्यात येई़ शेतकºयांच्या ‘घामाची फुले’ अशाप्रकारे घरी येत़ आल्यानंतर घरधनीन बैलांची पाय धुई़ त्याच्या माथ्यावर अक्षत,कुंकू लावण्यात येत़धुरकºयाचा मान होई़
ज्वारीचं खळं संपलं की ही जागा तशीच राहायची़ मग जानेवारी-फेब्रुवारीत तूरही याच जागी ठोकण्यात येई़ वावरात तूर ‘सोंगली’ की तिला याच ठिकाणी आणावी लागे़पूर्णपणे वाळेपर्यंत तिची राखण करावी लागे़ इतर शेतकºयांच्याही तुरीच्या पेंड्या तेथे हजर व्हायच्या़ मग अनेकांचा रात्रीचा मुक्काम चाले़ अशावेळी तिथं झोपण्यात खूप मजा येई़ तूर वाळली की तिला ठोकली जाई़ तुरीच्या मुठीत येईल इतक्या काड्या घेऊन शेंगांना लाकडी काठीने झोडपायचे़ त्यामुळे दाणे खाली पडत़ बहुतांश बायकांकडूनच तूर ठोकण्याचे काम करण्यात येत़ तुरीच्या संपूर्ण पेंड्या ठोकून झाल्या की मग त्यांना हवेच्या दिशेने उफणण्यात येई़ ही पद्धत अगदी ज्वारीसारखीच होती़ काम आटोपले की मग एका रात्री खळ्यावर ‘घुगºया’ शिजत़ घरातील सदस्य, शेजारीपाजारी, नातलगांना बोलाविण्यात येत़ ‘घुगºया’ म्हणजे तुरी भिजवून तिची भाजी करणे़ रात्रीच्या चांदण्यातील हे जेवण म्हणजे तो काय सोहळा काय वर्णावा!
आता हे सारं सरलं़ थे्रशर नावाचं यंत्र आल्यापासून श्रम वाचले़ या यंत्रात ज्वारीची कणसं टाकली की ‘डायरेक्ट’ दाणे पोत्यात पडतात़ तुरीही ठोकून आत टाकल्या पोते आपोआप भरली जातात़ एका दिवसात काम आटोपते़ बैलांचेही श्रम वाचले़ शेतकºयाची मेहनत वाचली़ मात्र, ‘खळे संस्कृती’ दूर गेली़

लेखक
संजय मुंदलकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *