कृषी विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर

(Last Updated On: September 20, 2020)

नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयके आज रविवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने दोन विधेयके आज राज्यसभेत चर्चेसाठी मांडण्यात आली होती.
तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी विधेयकाच्या विरोधातील प्रस्ताव सभागृहात सादर केला. हे विधेयक मोठ्या कंपन्यांच्या फायद्याचे असून यामुळे शेतकºयांच्या हिताचे रक्षण होणार नाही, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पाटीर्चे खासदार के.के. रागेश यांनी केली. चर्चेदरम्यान विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजी आणि गदारोळातच आवाजी मतदानाने विधेयक मंजूर झाले.
दरम्यान, ही ऐतिहासिक विधेयके असून यामुळे शेतकºयांच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील. त्यांना हमीभावाची सुरक्षा मिळत राहणार राहतील. या विधेयकामुळे शेतकºयांना त्यांचा शेतमाल देशात कुठेही कुठल्याही परवान्याविना विकता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *