Home राजधानी मुंबई राज्यात कोविडसंदर्भात २.६२ लाख गुन्हे दाखल

राज्यात कोविडसंदर्भात २.६२ लाख गुन्हे दाखल

183

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६२ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, ३५ हजार ७९५ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५ कोटी ७९ लाख ३ हजार ५६४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊन म्हणजे २२ मार्च ते १९ सप्टेंबर या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना ३५८ (८९४ व्यक्ती ताब्यात) इतक्या प्रमाणात आहेत. १०० नंबरवर आलेले फोन १ लाख १३ हजार ११६ इतके आहेत. अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर दाखल गुन्ह्यांचे प्रमाण १,३४७ इतके आहेत. जप्त केलेल्या वाहनांची संख्या ९६ हजार १७२ इतकी आहेत.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले आहे.(महासंवाद)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here