प्रभूप्रति प्रेम…SAAY pasaaydan

(Last Updated On: September 21, 2020)

संत राजिन्दर सिंहजी महाराज

प्रभूप्रति प्रेम आणि श्रद्धा याचा अर्थ काय? ही एक शब्दहीन अवस्था आहे. हा तो अनुभव आहे, जो विविध स्तरावर केला जातो. आपला अभिमान आणि अहंकाराला प्रभूप्रेमाने युक्त केले पाहिजे. प्रभूप्रति प्रेम आणि श्रद्धा हे आत्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाचे मार्ग आहेत; परंतु आपण याला कसे विकसित केले पाहिजे? प्रभूप्रति प्रेम व श्रद्धा वृद्धिंगत करण्याची प्रक्रिया म्हणजे अशा अडचणी आणि मनातील चलबिचल दूर करणे आहे, ज्या आपणास या अंतर्मुख विद्यमान मूळ अवस्थेला प्राप्त करण्यापासून रोखून ठेवतात.
प्रेम आणि श्रद्धा ही अशी रहस्यमयी कुंजी आहे,ज्याद्वारे आपल्या आत्म्याचे मिलन
परमात्म्याशी होऊ शकते. प्रभूप्रेम आहे आणि आणि या दोघांना जोडणारा पुल म्हणजे प्रभूची ज्योती आणि श्रुती़ ती सुद्धा प्रेम आहे. आपण प्रभूच्या ज्योती आणि श्रुतीशी संपर्क कसा करू शकतो? ध्यान-अध्यास ही भौतिक प्रक्रिया नाही. कारण भौतिक विज्ञान तर भौतिक जगताच्या नियमांनुसार कार्य करते. प्रभू, आत्मा आणि त्याची ज्योती तसेच श्रुती चैतन्यमय आहेत. या भौतिक जगताच्या पार त्यांचे अस्तित्व आहे. जेव्हा आपण अंतर्मुख ज्योती व श्रुतीच्या धारेशी जोडले जातो, आपला आत्मा या धारेवर आरूढ होऊन प्रभूंजवळ जाऊन पोहचतो, जिथून ही धारा प्रवाहित होते. याचप्रकारे प्रेम सुद्धा भौतिक अवस्था नाही, ही तर आत्म्याची अवस्था आहे. दिव्यप्रेम हे आत्मा व परमात्मा तथा ज्योती आणि श्रुतीची अवस्था आहे. जेव्हा आपण ध्यान-अभ्यास करतो तेव्हा आपण या दिव्य प्रेममयी अवस्थेत लीन होऊन जातो. या अवस्थेत लीन होणे हीच श्रद्धा आहे.
अशी कोणती बाब आहे, जी आपणास या प्रेमापासून दूर ठेवते? आपण त्या दिव्यप्रेमाशी
जोडले जाऊ नये म्हणून सातत्याने मन आणि अहंकार बाधा निर्माण करतात. जे लोक संसारिक बाबींमध्ये गुंतलेले आहेत, त्यांना मनाला शांत करणे अवघड वाटते. जर आपण आपला श्वास आणि हृदयाच्या स्पंदनांमध्ये प्रेम व श्रद्धा यांचा विकास करू शकलो, तर आपण कायमस्वरूपी प्रभूंचे होऊन त्याच्या धामी पोहोचू शकतो.
ध्यान अभ्यासाची सफलता प्रभूप्रति आपले प्रेम आणि श्रद्धा यांवर अवलंबून असते.
जितके अधिक आपण आंतरिक ज्योती आणि श्रुती यांवर ध्यान टिकवू, त्यामध्ये डुबकी मारू, तितके अधिक प्रभूप्रेम आपल्या अंतरी उचंबळत राहते. समयानुसार आपण प्रभूप्रेमाची पुष्टी करू लागतो. जेव्हा आपण प्रभूप्रेम वृद्धिंगत करू लागतो, तेव्हा ध्यान अभ्यासाच्या निर्देशांना गांभीर्याने घेऊ लागतो. जेव्हा आपण असे करू लागतो तेव्हा अध्यात्मिक प्रगतीचे परिणाम दिसू लागतात.आपण अशा बिंदूवर जाऊन पोहोचतो, जिथे आपल्या मनात आणि अहंकारामुळे निर्माण होणाºया इच्छांऐवजी परमात्म्यावर अधिक प्रेम करू लागतो़ प्रभूंकडे आपण आकर्षित होतो आणि अध्यात्मिक प्रगती करू लागतो. आपणास केवळ प्रभूंप्रति प्रेम व श्रद्धा वृद्धिंगत करण्याची आवश्यकता आहे.
चला तर, आपण ध्यान-अभ्यास, निष्काम सेवा तसेच स्वत:मध्ये सद्गुणांचा विकास करून प्रभूप्रति आपले प्रेम आणि श्रद्धा दर्शवूया.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *