Home उपराजधानी नागपूर नागपूर पोलिस कोविड रुग्णालयाचे उद्घाटन

नागपूर पोलिस कोविड रुग्णालयाचे उद्घाटन

315

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत यांच्या आॅनलाईन उपस्थितीत आज नागपूर पोलिस कोविड रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले.
सध्या कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलिसांना कोरोनाशी लढा देताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे त्यांच्या हक्काचे कोविड हॉस्पिटल असावे, या संकल्पनेतून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस मुख्यालय परिसरात नागपूर पोलिस कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. हा सोहळा २१ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते आॅनलाईन पद्धतीने पार पडला.

कार्यक्रमात पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., विशेष पोलिस महानिरीक्षक (नागपूर परिक्षेत्र) चिरंजीव प्रसाद, सहपोलिस आयुक्त निलेश भरणे, पोलिस अधीक्षक नागपूर (ग्रा.) राकेश ओला, वैद्यकीय अधिष्ठाता, डॉक्टरर्स, सर्व उपायुक्त, पोलिस अधिकारी उपस्थित होते.