Home प्रादेशिक विदर्भ महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर शिष्टमंडळाची नाना पटोले यांच्यासोबत चर्चा

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चर शिष्टमंडळाची नाना पटोले यांच्यासोबत चर्चा

204

भंडारा  : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली.
महाराष्ट्रातील उद्योग, कृषिसंलग्न उद्योग, वाहतूक, वीज बिलात सवलत, विदर्भात पर्यटन प्रोत्साहन योजना तसेच कोविड-19 परिस्थितीमुळे उदभवलेले प्रश्न आदि मुद्यांसंदर्भात शिष्टमंडळाने चर्चा केली. निर्यातवाढीसाठी राज्य सरकारने प्रोत्साहन योजना जाहीर करावी तसेच नाशिकहून मोठ्या प्रमाणात शेतीमाल ट्रक-कन्टेनरने जेएनपीटीपर्यंत न्यावा लागतो, त्याच्या जलद व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने नाशिक ते जेएनपीटी असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार व्हावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदीमध्ये शेतकरीबांधवांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या यासंदर्भातील प्रकरणांना तातडीने न्याय मिळावा यादृष्टीने स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी हिताच्या त्यांच्या या भूमिकेचे यावेळी स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्र्रकांत मोकल, आशिष पेडणेकर,करुणाकर शेट्टी, सागर नागरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here