पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट गरजेचे : मुख्यमंत्री

(Last Updated On: September 21, 2020)

मुंबई : ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपमुळे शेतकºयांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. येणाºया काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी ई-पीक पाहणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विकास रस्तोगी, निवृत्त मुख्य सचिव जयंत बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, प्रकल्प सल्लागार नरेंद्र कवडे, संभाजी कडू पाटील, तंत्रज्ञ प्रमुख निलेश खानोलकर यांच्यासह टाटा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की आज कृषी विभागाने विकेल ते पिकेल ही योजना आणली असून या योजनेंतर्गत चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे यावर भर देण्यात येत आहे. मोबाईल अ‍ॅपमुळे शेतकरीवर्ग संघटित होणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये केवळ शेतकºयांची माहिती गोळा करणे हे लक्ष्य नसून कोणतं पीक घेणे आवश्यक आहे, कोणते पीक कोणत्या विभागात घेतले जाणे आवश्यक आहे, कोणत्या पिकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे, पिकाला योग्य भाव कसा मिळेल आदी माहिती मिळणे आवश्यक आहे.
ई-पीक पाहणी संदर्भात मोबाईल अ‍ॅप विकसित करताना यामध्ये कोणत्याही उणिवा राहू नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वस्तुस्थिती दर्शक, सद्यस्थिती दर्शक माहिती संकलित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अ‍ॅपमध्ये शेतकºयांना आॅनलाईनबरोबरच आॅफलाईन पद्धतीने माहिती, इमेजेस अपलोड करण्याची सोय देण्यात आल्याची बाब योग्य असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *