Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन

93

सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले असून साताºयातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरू होते. धक्कादायक म्हणजे आशालता वाबगावकर यांच्याव्यतिरिक्त सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.
माहितीनुसार, आशालता यांना ‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या छायाचित्रणादरम्यान कोरोनाची लागण झाली होती. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर साताºयातच उपचार सुरू होते. अखेर आज मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जवळपास 40 हून अधिक वर्षांत त्यांनी रंगभूमी, 100 हून अधिक हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत. नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, हे विशेष. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.
काही भूमिका : जंजीर (1973), चलते चलते (1976), अपने पराये (1981), आहिस्ता आहिस्ता (1981) उंबरठा, शौकीन, लव्ह इन गोवा, कुली, सदमा, हमसे है जमाना, वहिनीची माया, शराबी, अंकुश, गंमत जंमत (1987), घायल (1990), माहेरची साडी (1991), फौजी (1994), अग्निसाक्षी (1996), बेटी नंबर वन, वन रूम किचन, सनराईज आदि.
——-