Home अनुपमा... महिला विश्व ANUPAMAA : अर्ध आकाश अजूनही निरभ्र…

ANUPAMAA : अर्ध आकाश अजूनही निरभ्र…

214

एकविसाव्या शतकात येऊन देखील तिच्या वाटेतील मळभ अजून सरलेलं नाही. कितीही शिकून पुढे गेली असली तरी तिच्या वाटेला आलेलं अर्ध आकाश अजून निरभ्र झालेलं नाही. हे आकाश निरभ्र व्हायला हवं म्हणून ती रडते, भांडते, चुकते, तुटते, सोडते अनेक गोष्टी आणि जोडते अनेक आशा… मात्र, आजही तिची पावलं रोखून धरतात. या समाजातील काहीजण तिला पुढे जाताना न पाहू शकणाºया द्वेषापोटी.

काय करावं तिने हे, ती सोडून बाकी सगळे ठरवतात़ अहो, इतकंच काय तर आपली इज्जत जाईल, या भीतीपोटी आपलीच काही नाती तिचं जगणं देखील हिरावतात. काय करावं जेव्हा तिनं पाहिलेली स्वप्न तिला मारतात दिसतात. जगायचं बाकी असतंखूप काही. मात्र पुरुषी अहंकाराने अनेकदा तिला कुस्करून टाकलेले असते,कधीही न उमलण्यासाठी!
काय करावं तिनं जेव्हा पहिल्यांदा ती स्त्री म्हणून आयुष्य सुरू करणार असत. होणाºया त्या वेदना मुकाट्यानं सहन कर असं सांगणारी तिची आईच तर असते…इतकं सगळं होऊन देखील भय इथलं संपत नाही़ आधी किमान माणुसकी तरी शिल्लक होती, आता काही नराधमांना पाळण्यातली चिमुकली देखील सोडवत नाही.
होते ती हतबल जेव्हा निर्भया तिचं नाव ठेवतात़ एकदा हा विचार केलात का? असंख्य यातना सहन केल्या असता तिला तुम्ही निर्भया का आणि कसं बोलतात? निर्भया म्हणजे जिला कुणाचंही भय नाही.आज परिस्थिती अशी आहे की ती आपल्या माणसात देखील सुरक्षित नाही.

रस्त्याने जाते जेव्हा एकटी तेव्हा,उभ्या पुरुषी नजरा तिला रोखतात. अनेकदा तर शारीरिक व्यंगावरून तिला बरेचजण तिला टोकतात़ तू जाड आहेस़ बारीक झालीस नाही. गोरी असती तर छान दिसली असती़ पिंपल्स खूप वाढलेत गं. तू ना जरा उंच हवी होती,शोभून दिसली असती…अरे का विसरतात काय हक्क आहे तुम्हाला तिला बोलायचा? तिला डिवचण्याचा, विचायचा! हेच विचारा तुम्ही कधी स्वत:ला…

मुळात सुंदरता ही बघणाºयाच्या मनात, डोळ्यांत असायला हवी. स्त्री कशीही असली तरी ती जगातली सर्वात सुंदर प्रतिकृती आहे, अशी शिकवण बालपणीच प्रत्येक घरात दिली जावी. तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणजे तिचं लग्न. सगळं काही आवडीचं मिळेल, नवरा मात्र आम्ही निवडणार…मुलगी आहेस तू!  लग्न तर थाटामाटातच होणार? तिच्या मनानं वा मनाविरुद्ध हा सोहळा पार पाडतो़ खरा संघर्ष तर तिचा आता तर चालू होतो. नवरा अनेकदा मित्रासारखा मिळतो. सासू अनेकदा आई होत नाही. सासरा मात्र बाप अनेकदा भासतो. मुलं झाली की आयुष्य तिचं तिथंच थांबतं. अनेकदा काही बंधनं झुगारून ती मार्ग शोधते़ यात अपयश आलं की मग हाल सोसते; पण जर यशस्वी झाली तर वाह ऽऽ वा, सगळे करतात. असे असले तरी आमची बंधनं झुगारून तिने हे मिळवलं हे सांगायला मात्र सगळेच जण टाळतात.

८ मार्चला म्हणे तिच्या कौतुकाचा मोठा सोहळा असतो़ घरात मानपान देत नाही तो देखील सोशल मीडियावर तिचा गोडवा गात असतो. महिला दिन एक दिवस नाही तर रोज साजरा व्हावा. कारण ती आहे म्हणून तुम्ही आहे. तुमच्या एक दिवसाच्या सोहळ्याची नाही,तर दिवसातील एका क्षणाची भुकेली असते ती. तो क्षण द्या तिला…मग बघा कशी सर्व संकटांवर मात करेल ती! तिला तुमच्या रक्षणाची नाही, तर तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.
पाठीवर तिच्या हात ठेवून आहेस तू सक्षम म्हणा…मग बघा ती कशी तिच्या समोरील वाईटाचे भक्षण करते…

धनश्री कलाल
नाशिक