आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी अधिक सुविधा : पर्यटनमंत्री

(Last Updated On: September 22, 2020)

मुंबई : राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘ईज आॅफ डुइंग बिझनेस‘अंतर्गत या क्षेत्राकरिता लागणाºया विविध परवानग्यांची संख्या कमी करणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मंत्रालयात यासंदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. हॉटेल, लॉजेस, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स यामधून फार अधिक रोजगारनिर्मिती होते. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी आवश्यक परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे उद्दिष्ट आहे, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनोत्तर काळात पर्यटन क्षेत्राला निश्चितच चांगले दिवस येतील. याअनुषंगाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरणही तयार होत आहे. खासगी आणि सार्वजनिक सहभागातून काही प्रमुख पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे. या व्यवसायाला चालना देण्यासाठी अर्ज, परवानग्यांची संख्या कमी करणे तसेच ही प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे असून यासाठी सर्व संबंधित विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री ठाकरे यांनी केले.
बैठकीस पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, कामगार विभागाच्या सचिव विनीता सिंगल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक दिलीप गावडे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *